आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या वैभववाडी तालुका उपाध्यक्षपदी भालचंद्र जाधव

तालुका सदस्यपदी संजय साळसकर, रघु कपनाचार यांची निवड

*💫वैभववाडी दि.२३-:* आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या वैभववाडी तालुका उपाध्यक्षपदी भालचंद्र भिवा जाधव यांची तर तालुका सदस्य म्हणून संजय साळसकर, रघु कपनाचार यांची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डाॕ. अविनाश सकुंटे, महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अफसर चांद कुरेशी यांनी नुकतीच त्यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल मुंबई व कोकण प्रभारी सिध्दू गावडे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मनोज सावंत , तालुकाध्यक्ष तेजस आंबेकर यांनी त्यांचे स्वागत केले.त्याच्या निवडीबद्दल सर्वञ अभिनंदन करण्यात येत आहे. संघटनेच्यावतीने समाजातील गुन्हे, भ्रष्टाचार, अन्याया विरोधात लढा देणारी धैर्यवान, निभर्य, निपक्षपाती संघटना म्हणून काम करीत आहे. समाजातील पिढीत लोकांच्या समस्या, तक्रारी एकञ करुन त्यांना सरकार, प्रशासन, पोलीस, न्यायव्यवस्था यांच्यासमोर मांडण्याचे काम करीत आहे.

You cannot copy content of this page