केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच लक्ष वेधणार असल्याच दिल आश्वासन*
*💫कुडाळ दि.२३-;* कुडाळ दि.२३ गेले चार दिवस जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे याचा फटका माणगाव खोऱ्याला देखील बसला आहे. माणगाव येथील २१ गावांना जोडणारा ब्रिजचा वरचा भाग कोसळल्याने भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आज भाजपचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पाहणी केली. यावेळी याबाबत तात्काळ आपण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच दुरुस्तीसाठी लक्ष वेधणार असल्याच आश्वासन विशाल परब यांनी ग्रामस्थांना यावेळी दिल आहे. यावेळी त्यांच्यासोबत माजी सभापती मोहन सावंत, उपसरपंच श्रावण धुरी, सचिन सावंत व अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
