खारेपाटण पूर परिस्थितीची जि.प . अध्यक्ष संजना सावंत यांनी केली पाहणी

*💫कणकवली दि.२२-:* मुसळधार पावसामुळे खारेपाटण येथे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून जि. प.च्या अध्यक्षा संजना सावंत यांनी सायंकाळी खारेपाटण गावाला भेट देऊन पुरजन्य परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्याच्यासमवेत कणकवली तालुका गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,विस्तार अधिकारी श्री वारंग,सांगे सरपंच सौ.मुंज ,खारेपाटण ग्रामविकास अधिकारी जि सी वेंगुर्लेकर अफी उपस्थित होते. खारेपाटण चेक पोस्ट येथील ब्रिटिशकालीन पुलाला तसेच खारेपाटण येथील पूर परिस्थितीला जि प अध्यक्ष संजना सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली . खारेपाटण येथील शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पूरपरस्थिती निर्माण होऊन खारेपाटण शहरात पुराचे पाणी शिरले आहे.खारेपाटणच्या नदीचे पात्र हे गाळाने भरले असून शुकनदीतील साचलेला गाळ उपसा करून नदीचे पात्र खोल करण्याचे आश्वासन संजना सावंत यांनी यावेळी दिले. याबाबतचा प्रस्ताव स्थनिक ग्रामपंचायतीने तात्काळ जिल्हा परिषदेकडे पाठवावा जिल्हा नियोजनामधून त्याला मंजुरी देऊन प्रधान्याने काम करण्यात येइल असे जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांनी सांगितले .

You cannot copy content of this page