*💫मालवण दि.२३-:* मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या सेवांगण उपक्रम समूहातर्फे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या ‘छद्म विज्ञान विरोधी लढा’ या विशेषांकावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत राज्यभरातून ६८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. ४० टक्केपेक्षा जास्त गुण मिळालेल्या स्पर्धकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेचा निकाल : प्रथम वैष्णवी आचरेकर, संजय आचरेकर, शिवराज सावंत, शर्वरी सावंत, गुरुनाथ ताम्हणकर, प्राची चोपडेकर, तनया कदम, श्रेया कदम, तेजल ताम्हणकर, उज्वला धानजी, यशश्री ताम्हणकर, वैजयंती करंदीकर, चंद्रशेखर धानजी, वैष्णवी धानजी, शिवम धानजी, मकरंद वायंगणकर, आरती कांबळी, शीतल गावित, नंदकुमार वडेर. द्वितीय-रामेश्वरी मगर, संतोष राऊत, शुभदा साळगावकर, जानवी ढोलम तृतीय-ऋतुजा केळकर, रुचिरा चिंदरकर, सोनाली कोळंबकर, सानिया वायंगणकर, पंढरी सावंत, संगीता देशपांडे, प्रिया कुबल. चतुर्थ श्रीकांत महाजन, सुनील माळवदे, अदिती कुडाळकर, घनाली चव्हाण, वृषाली करंजेकर, अर्चना धुत्रे, प्रिया कुबल, वर्षा पराडकर, अस्मिता परब, प्रकाश उनकुले, मलिष्का लोहार, साक्षी देसाई, जयप्रकाश पेडणेकर. उत्तेजनार्थ सोमनाथ रिया परब, परब, गौरव परब, स्नेहलता तेली, रामकृष्ण राणे, श्रवण वाळवे, अनघा मालवणकर. बॅ. नाथ पै सेवांगण परिवाराने स्पर्धा यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. या समारंभास सेवांगणचे अध्यक्ष अॅड. देवदत परुळेकर, कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, मालवण व कट्टा शाखेचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अंधश्रद्धा निर्मूलन, वार्तापत्राचे संपादक राजू देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. माधवी मेस्त्री यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.
सेवांगणच्या ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल जाहीर
