गोळवण येथे रास्तधान्य दुकानाचे उद्घाटन

*💫मालवण दि.२२-:* गोळवण येथे शासनाने धान्य दुकान सुरू करण्यास परवानगी दिली आहे. गोळवण ग्रामपंचायत विस्तारित इमारतीत या धान्य दुकानाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. गोळवण येथील महिला बचतगट तसेच आमदार वैभव नाईक यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे धान्य दुकान मंजूर झाले. गोळवण गावठणवाडी येथील गौतमेश्वर महिला स्वयंसहाय्यता बचत गटाने हा धान्यदुकान परवाना घेतला असून मंगळवारी त्याचे उद्घाटन गोळवण ग्रामसेवा संघाच्या अध्यक्षा राजश्री तेजम यांच्या हस्ते झाले. सरपंच सुभाष लाड, उपसरपंच साबाजी गावडे, ग्रामसेविका माधुरी कामतेकर, ग्रा.पं. सदस्य, गौतमेश्वर बचतगटाच्या नेहा परब, दीक्षा परब, रविना परब, सावित्री परब, माजी सरपंच प्रज्ञा चव्हाण, शिवसेना पोईप जि. प. उपविभागप्रमुख भाऊ चव्हाण, चिरमुले आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page