*रो. ॲड. दीपक नेवगी यांचे प्रतिपादन
*💫सावंतवाडी दि.२१-:* जगात मानव धर्म हा एकच धर्म आणि माणूसकी आणि प्रेम ही एकच जात आहे, असे प्रतिपादन रो. ॲड. दीपक नेवगी यांनी केले. आषाढी एकादशीचे निमित्त साधुन मंगळवारी रोटरी क्लब सावंतवाडीने रोटरी क्लब, सावंतवाडीत असणाऱ्या ५८ रत्नांपैकी रो. ॲड. दीपक नेवगी आणि व्यवसायाने बिल्डर असुन ही किर्तनातुन समाज प्रबोधन करणारे रो. सुहास सातोसकर यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या सत्काराला उत्तर देताना ॲड. नेवगी बोलत होते. हा सत्कार रमेश भाट, रो. दिलीप म्हापसेकर, रो. विजय कामत, रो. वल्लभ नेवगी, रो. भालचंद्र कशाळीकर यांच्या हस्ते झाला. यावेळी अध्यक्ष रो. साईप्रसाद हवालदार, सचिव रो. सीए सुधीर नाईक, रो. प्रमोद भागवत, रो. ॲड. सिद्धार्थ-भांबुरे, रो. राजेश पनवेलकर, रो.राजेश-रेडीज उपस्थित होते. नेवगी पुढे म्हणाले, किर्तनातुन माणूस धडतो आणि हाच आदर्श समाज धडवू शकतो ही किर्तनाची ताकद आहे. रोटरीच्या कार्याचे वर्णन करताना त्यांनी भगवत गीतेतील एका श्लोकाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, रोटरीने आज ११६ वर्षे केलेले कार्य मानव जातीच्या कल्याणासाठी, कोणत्याही फळाची अपेक्षा न बाळगता करीत आलेली आहे. रो. सुहास सातोसकर यांनी आपण गुरुकृपेमुळेच आपण किर्तनकार होऊ शकलो, हे अभिमानानी सांगितले. ते पंत बाळेकुंद्री महाराजांचे निश्चिम भक्त आहेत. ते पुढे म्हणाले की, परमेश्वरानी विश्वाची निर्मिती ही केवळ प्रेमासाठीच केलेली होती. पुढे जाऊन मानव हे विसरला आणि याची जाणीव करुन देण्यासाठी महापुरुषाना वेळोवेळी जन्म घ्यावा लागला, असे सांगितले. सचिव रो. सीए सुधीर नाईक यांनी आभार मानले.
