दोडामार्ग तालुक्यात एमआयडीसी होत असल्याने तंत्रकुशल शिक्षणाची गरज

टेक्निकल शिक्षणासाठी प्रयत्न करणार;भोसले पॉलिटेक्निक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अच्युत भोसले यांची माहिती

*💫दोडामार्ग दि.२१ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात नव्याने होऊ घातलेल्या एमआयडीसी मुळे त्याठिकाणी तंत्रकुशल मनुष्यबळ लागणार असून त्यासाठी आतापासूनच प्रयत्न व्हायला हवे.यासाठीच आताचं दहावी, बारावी विद्यार्थ्यांनी टेक्निकल नॉलेज आणि एज्युकेशन घेणे काळाची गरज आहे. या तालुक्याचा मी सुपुत्र असल्याने येथील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे अशी माहिती यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष श्री. अच्युत सावंत भोसले यांनी दोडामार्ग येथे स्नेह रेसिडेन्सी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मी स्वतः दोडामार्ग तालुक्याचा सुपुत्र असल्याने येथील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न आहे. यासाठी यशवंतराव भोसले पॉलीटेक्निक तर्फे विविध योजना आखण्यात आलेल्या आहेत. संस्थेतील इंजिनिअरिंगचे शिक्षण SC, ST,SBC, NT विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांमुळे हे शिक्षण संपूर्णपणे मोफत मिळत आहे. तसेच या विद्यार्थ्यांना वसतिगृह सुविधा देखील पूर्णपणे मोफत ठेवण्यात आलेली आहे. ओपन व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनादेखील 50 टक्के फी सवलत जाहीर करण्यात आली आहे. दोडामार्ग तालुक्यातील विशेषतः 25 मुलींसाठी वसतिगृह सुविधा देखील मोफत ठेवण्यात आलेले आहे. या सर्व सवलतींचा फायदा घेऊन दोडामार्ग तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तंत्रकुशल बनावे व आपले उज्वल भवितव्य घडवावे. दोडामार्ग तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश सुविधा केंद्र टोपले कॉम्प्लेक्स दोडामार्ग बाजारपेठ येथे सुरू करण्यात आलेली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी ठिकाणी संपर्क करावा असे आवाहन यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी केले आहे.

You cannot copy content of this page