जयेंद्र रावराणे, संजय सावंत यांच्यासह वैभववाडी भाजपा पदाधिकाऱ्यानी घेतली भेट
*💫वैभववाडी दि.२१-:* माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी नगरसेवक संजय सावंत भाजपा पदाधिकाऱ्यासह केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांची दिल्ली येथे भेट घेतली. व त्यांना शुभेच्छा दिल्या. कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय उद्योगमंत्रीपदी निवड झाल्यानंतर वैभववाडी तालुक्यात कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला होता. रविवारी जयेंद्र रावराणे, संजय सावंत यांच्या सोबत तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांचे अभिनंदन करण्यासाठी थेट दिल्ली गाठली. यामध्ये माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, माजी नगरसेवक संजय सावंत, भाजपा पदाधिकारी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर कदम, शरद नारकर, रवी किशोर चव्हाण यांचा समावेश होता.
