सात्विक गोमेय गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस मूर्तीकारांचा प्रतिसाद

तुळस येथे एकदिवसीय कार्यशाळा

वेंगुर्ला प्रतिनिधी-लुपिन फाऊंडेशन सिंधुदुर्ग व परिवर्तन केंद्र-वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि प्रवण शेतकरी उत्पादक कंपनी वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस येथे सात्विक गोमय मूर्ती निर्मिती एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. आपल्या भारतीय संस्कृतीत देशी गायीला अनन्य साधारण महत्व आहे. देशी गायीचे शेण, गोमूत्र आणि उपलब्ध माती यापासून सात्विक पर्यावरणपुरक आणि वजनाने हलक्या असणा-या आणि पीओपीला पर्याय ठरणा-या सात्विक गोमेय गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस गणेश मूर्तीकार यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी तज्ञ मार्गदर्शक विलास मळगावकर यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना मूर्ती आणि त्यासाठी लागणारे मटेरियल कसे तयार करावे याचे प्रात्याक्षिकासहित सखोल मार्गदर्शन केले. सात्विक गोमेय गणेश मूर्तींना मोठी मागणी असून, या मूर्ती पर्यावरण पूरक आहेत, यातून आपला मूर्तिकार वर्षभर मूर्त्या तयार करून स्वतःची उन्नती सोबत देशी गायी आणि पर्यावरण याचे संरक्षण करु शकतात असे प्रतिपादन लुपिनचे नारायण परब यांनी केले. यावेळी लुपिनचे संतोष कुडतरकर, प्रतिष्ठानचे सचिव प्रा. सचिन परुळकर, अजय नाईक, गुरुदास तिरोडकर, प्रसाद परुळकर, महेश राऊळ, किरण राऊळ, मिलन नाईक, सचिन गावडे, सदन वराडकर, अनिल परुळकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

You cannot copy content of this page