सनातन संस्था, हिंदू जनजागृती समितीचे २३ रोजी ऑनलाईन आयोजन
*💫मालवण दि.२१-:* सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त दि. २३ जुलै रोजी ११ भाषांमध्ये ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे यंदा ऑनलाईन कार्यक्रम होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात यानिमित्त १०० हून अधिक प्रवचने ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या प्रवचनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगु, तमिळ, पंजाबी, बंगाली, ओडिया आणि मल्याळम् या ११ भाषांमध्ये २३ जुलैला ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या महोत्सवांत श्रीगुरुपूजन, सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संग्रहित भाग, स्वसंरक्षण प्रात्यक्षिके (बचाव आणि आक्रमण), आपत्काळाच्या दृष्टीने करावयाची सिद्धता (चलचित्र), तसेच आत्पकाळात हिंदूंचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना याविषयी वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. गुरु म्हणजे काय, गुरुंचे जीवनातील महत्त्व, गुरुकृपा कार्य कशी करते, त्यासाठीचे मार्गदर्शन या महोत्सवात होणार आहे. मराठी भाषेतील ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ हा २३ जुलैला सायंकाळी ७ वाजता होणार असून तो Youtube.com/SanatanSanstha आणि www.sanatan.org/mr/ या लिंकवर पाहता येणार आहे. तर https://www.sanatan.org/mr/gurupurnima या संकेतस्थळावर अन्य भाषांमधील गुरुपौर्णिमा महोत्सवांविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे. तरी सर्वांनी या ऑनलाईन गुरुपौर्णिमा उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन सनातन संस्था सिंधुदुर्ग तर्फे श्री.संजोग साळसकर यांनी केले आहे.
