जी प अध्यक्षा सौ सावंत, सभापती शर्वाणी गांवकर, निकिता सावंत यानी दिली भेट
*💫आंबोली दि.२०-:* आंबोली बसस्थानक येथील सुलभ शौचालयाचे काम रेगाळल्यामुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तेथे बायोडायव्हर्स टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना केल्या होत्या. परंतु, या कामाचा खर्च कोणी करायचा ग्रामपंचायत की, एसटी महामंडळ हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या शौचालयाच्या कामाची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जि. प. बाल कल्याण सभापती शर्वानी गावकर , पंचायत समिती सभापती निकिता सावंत यांनी आंबोली ग्रामपंचायतीला भेट देत याबाबत चर्चा केली आहे. यावेळी बसस्थानक आवारातील सुलभ शौचालयाचे काम गेले सहा महिने सुरू असून, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे सदर काम रखडले असल्याचा आरोप जि. प. सदस्या रोहिणी गावडे यांनी केला आहे. या कामचुकार आणि उद्ध्ट उत्तरे देणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी देखील रोहिणी गावडे यांनी यावेळी केली आहे.
