इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लेची नवीन कार्यकारिणी जाहीर

अध्यक्ष ज्योती देसाई, सचिव स्मिता दामले

वेंगुर्ला प्रतिनिधी- इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ल्याच्या सन २०२१-२२ च्या नुतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली आहे. या कार्यकारीणीवर अध्यक्षपदी ज्योती देसाई तर सचिवपदी स्मिता दामले यांची एकमताने निवड झाली आहे. इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ल्याच्या नुतन कार्यकारीणी निवडीची सभा साईमंगल कार्यालयाच्या सभागृहात इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा गौरी मराठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत क्लबच्या सन २०२१-२२ या वर्षासाठी नुतन कार्यकारीणीची निवड एकमताने करण्यात आली. या कार्यकारीणीत अध्यक्षपदी ज्योती देसाई, उपाध्यक्षपदी आफशान कौरी, सचिवपदी स्मिता दामले, खजिनदारपदी समिक्षा वालावलकर, आय.एस.ओ.पदी वृंदा गवंडळकर, एडीटर पूजा कर्पे यांचा समावेश आहे. या नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा बुधवार दि. २१ जुलै रोजी साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे विद्या करंदीकर व प्रमुख पाहुण्या उमा पाटील यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन होणार आहे.

You cannot copy content of this page