एमआयडीसीच्या २८ एकर जागेत प्रदूषण विरहित प्रकल्प उभा करण्याची केली मागणी
*💫वैभववाडी दि.१९- :* वैभववाडी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री भाजप नेते नारायण राणे यांची दिल्ली येथे जाऊन भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी झालेल्या चर्चेवेळी नााधवडे येथे एमआयडीसीची २८ एकर जागा असून या ठिकाणी प्रदूषण विरहित प्रकल्प करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तालुक्यातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न आहे, असे राणे यांनी यावेळी सांगितले. या भेटीवेळी तालुकाध्यक्ष नासिर काझी, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, उपसभापती अरविंद रावराणे, संताजी रावराणे, सुनील भोगले उपस्थित होते.
