प्रताप भोसलेंनी घेतली नारायण राणेंची भेट

*💫कणकवली दि.१८-:* कणकवली मराठा सेवा संघाचे कोकण प्रांत सचिव तथा युवा उद्योजक प्रताप भोसले व ठेकेदार मुदस्सर शिरगावकर यांनी नुकतीच नवनिर्वाचित केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी कोकणच्या विविध प्रश्न, समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. भोसले, शिरगावकर यांनी राणे यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील विविध विकासकामे , उद्योगधंदे याविषयी भोसले यांनी राणे यांच्याशी चर्चा केली. कोकणच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याची ग्वाही राणे यांनी दिली. दानवे यांचीही रेल्वेभवन येथे भेट घेण्यात आली. कोकण रेल्वेच्या विविध समस्या सोडविण्याची ग्वाही देखील दानवे यांनी दिली. याप्रसंगी नारायण राणे यांचे स्वीय सहाय्यक संतोष चव्हाण उपस्थित होते.

You cannot copy content of this page