कोकण हायवे समन्वय समितीतर्फे पनवेल ते झाराप मानवी साखळी जन आंदोलन

महामार्गावर पडलेले खड्डे, चिखलमय स्थिती व अपघात प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधणार

मालवण दि प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर काही ठिकाणी झालेले नित्कृष्ट दर्जाचे काम, महामार्गावर काही ठिकाणी पडलेले खड्डे, चिखलमय स्थिती व त्यातून होणारे अपघात या सर्व प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोकण हायवे समन्वय समितीतर्फे दि. ८ ऑगस्ट रोजी चिपळूण येथे तसेच दि. ९ सप्टेंबर रोजी पनवेल ते झाराप मानवी साखळी जन आंदोलन छेडण्यात येणार आहे. या लढ्यात सहभागी होऊन योगदान देऊ इच्छिणाऱ्या सभासद व नागरिकांनी समितीकडे नावे नोंदवावीत असे आवाहन कोकण हायवे समन्वय समितीचे समन्वयक डॉ. दीपक परब यांनी केले आहे. मुंबई गोवा महामार्गावर काही ठिकाणी नित्कृष्ट दर्जाचे काम झाले आहे. पावसात या मार्गावर काही ठिकाणी खड्डेही पडले असून त्याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. महामार्गाच्या या समस्यांबाबत कोकण हायवे समन्वय समिती लढा देत असून शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. या पार्श्वभूमीवर या समितीतर्फे दि. ८ ऑगस्ट रोजी चिपळूण येथे तसेच दि. ९ सप्टेंबर रोजी पनवेल ते झाराप मानवी साखळी जन आंदोलन छेडण्यात येणार आहे. यासाठी कार्यकर्ता संघटन मोहीम राबविण्यात येत आहे. कोकण हायवे समन्वय समिती मधील तसेच कोकण बिझनेस फोरम या उपक्रमा मधील ज्या सभासदांना जन आंदोलनात तसेच कोकण हायवे समितीमधील विविध विभागांमध्ये कार्यकर्ता म्हणून सहभागी होण्याची इच्छा तसेच आवश्यक असे वेळेचे योगदान देण्याची तयारी आहे अश्या सभासदांनी आपली नावे समितीकडे द्यावीत, असे आवाहन समितीचे समन्वयक डॉ. दीपक परब यांनी केले आहे. इच्छुक सभासदांनी कोकण हायवे समितीचे विभाग: १)कायदा/दबाव गट विभाग २)सोशल मीडिया विभाग ३)तांत्रिक विभाग, ४)जिल्हा/तालुका समन्वयक विभाग, ५)जनरल अडमिनिस्ट्रेशन विभाग, कार्यकर्ता माहितीचा तपशील:- सभासदाचे नाव,, गावचे नाव, तालुका/जिल्हा, सध्या राहण्याचे ठिकाण, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी, शिक्षण/नोकरी/व्यवसाय, विशिष्ट गुणांचा तपशील, इच्छुक विभाग आदी तपशीला आपली माहिती उत्तम दळवी- 9769075036/ 9326707578, विवेक चव्हाण- 9819438856 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावी, जेणेकरून त्यांना पुढील नियोजनामध्ये सहभागी करून घेण्यात येईल, असे डॉ. दीपक परब यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page