*💫कणकवली दि.१८-:* ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत खारेपाटण येथील शेठ नविनचंद्र मफतलाल हायस्कूलच्या प्राथमिक शिक्षण विभागातील छोट्या विद्यार्थ्यांनी उत्तम असे यश मिळवलेले आहे. या वर्षी कोरोना महामारीमुळे परीक्षा रद्द झाल्या होत्या. परंतु ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा ही मात्र ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागातील पहिली ते चौथी मधील सुमारे 31 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या परीक्षेत खारेपाटण हायस्कूलचा १००% निकाल लागला आहे. तर ४- विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल व ३ विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल आणि ६ – विद्यार्थ्यांनी ब्रॉन्झ मेडल मिळवले आहे. विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष अभिनंदन खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, संस्थेचे सेक्रेटरी महेश कोळसुलकर,शाळेचे मुख्याध्यापक अकीवाटे ,पर्यवेक्षक संजय सानप खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए डी कांबळे सर शिक्षण संस्थेचे सर्व संचालक व पालक यांनी केले आहे. गोल्ड मेडल विद्यार्थी कु.स्वर मिलीद डोळ (इयत्ता १ ली ) कु.आर्या प्रकाश गाठे (इयत्ता ३ री ) जावेद हनिफ काझी (इयत्ता ३ री ) मयुरेश राजेंद्र दर्पे (इयत्ता चौथी ) सिल्वर मेडल विद्यार्थी कु.काव्या संतोष कर्ले (इयत्ता -२ री ) कु.दिबा इरफान ठाकूर (इयत्ता -२ री) अभिनव लक्ष्मीकांत हरयाण (इयत्ता ३री) ब्रॉंझ मेडल विद्यार्थी कु.निधी वैभव शिवलकर (इयत्ता – १ ली),कु.सेजल संजय कुडतरकर (इयत्ता १ ली ),सोहम सुशील कुंबळे (इयत्ता – १ ली ),कु.आदिती गणेश खेडकर (इयता – २ री ),कु.दीक्षा किरण कर्ले (इयत्ता – २ री ),भार्गव प्रशांत गुडेकर (इयत्ता — ३ री ) वरील सर्व विद्यार्थ्यांनी अनुक्रमे यश संपादन केले आहे. या परिक्षेकरिता खारेपाटण हायस्कुल मधील प्राथमिक विभागाकडून एकूण ३१ मुले बसली होती.यापैकी ४ विद्यार्थी गोल्ड मेडलिस्ट,३ विद्यार्थी सिल्व्हर मेडलिस्ट तर ६ विद्यार्थी बॉंझ मेडलिस्ट म्हणून निवड झाली आहे.तर १८ विद्यार्थी पास झाले आहे.
बीडीएस स्कॉलरशिप परीक्षेत खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागाचे यश
