अधिकारी घटनास्थळी दाखल
*💫वैभववाडी दि.१८-:* मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे. यामुळे मार्गातून वाहतूक ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकामच अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू केले अखेर सायंकाळी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. तालुक्यात आठवडाभर संततधार पाऊस सुरु आहे. रविवारी सकाळी जोरदार झालेल्या पावसाने भुईबावडा घाटात दरड कोसळली. दरडीचा मोठा भाग रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. करुळ घाटमार्ग दुरूस्तीसाठी बंद करण्यात आल्यामुळे सर्व वाहतूक भुईबावडा घाटमार्गातून वळविण्यात आली होती. शनिवारी भुईबावडा घाटात दरड कोसळली होती. मात्र प्रशासनाने या मार्गातून एकेरी वाहतूक सुरू केली होती. रविवारी तालुक्यातील करूळ व भुईबावडा हे दोन्ही घाट मार्ग बंद असल्याने घाट माथ्याकडे होणारी वाहतूक थांबली होती अखेर सायंकाळी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.
