अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

सोनाळी -कुंभारी मार्गावरील घटना;वनविभागाचे अधिकारी दाखल

वैभववाडी प्रतिनिधी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोनाळी नजीक घडली आहे. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सोनाळी – कुंभारी मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्युमुखी पडला. वाहनाची धडक जोरात बसल्याने बिबट्याच्या तोंडातून व कानातून रक्त प्रवाह झाला. व त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर, वनपाल सदाशिव वागरे, वनरक्षक उत्तम कांबळे, वनरक्षक किरण पाटील, वनमजूर मराठे, श्री पाताडे घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अंबी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

You cannot copy content of this page