शिवसेनेेचे जुने कट्टर कार्यकर्ते तथा शिवाजी चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष गुरू वालावलकर यांचे निधन

*💫सावंतवाडी दि.१६-:* सावंतवाडीतील शिवसेनेेचे जुने कट्टर कार्यकर्ते तथा शिवाजी चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष गुरू वालावलकर यांचे आज सकाळी दुखःत निधन झाले.त्यांच्यावर कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात अधिक उपचार सुरू होते. पण आज अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सावंतवाडीत शिवसेना पक्षाची पाळेमुळे खोल रूजवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांना शिवसेनेत आणण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे . त्यांच्या या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,मुली असा परिवार आहे.

You cannot copy content of this page