जिल्ह्यात संततधार कायम

मालवण तालुक्याला पावसाने झोडपले

*💫सिंधुदुर्गनगरी, दि.१६-:* जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून गेल्या चोवीस तासात सरासरी 143.25 मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्यात 303 मि.मी. नोंद झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी 2006.288 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 89(1984), सावंतवाडी – 120(2196.10), वेंगुर्ला – 140(1717.20), कुडाळ – 169(1925), मालवण – 303(2421), कणकवली – 113(2043), देवगड – 104(1791), वैभववाडी – 108(1973), असा पाऊस झाला आहे.

You cannot copy content of this page