तर कोकण बोर्ड १०० टक्क्याने पुन्हा एकदा ठरला राज्यात अव्वल
*💫सिंधुदुर्ग दि.१६-:* राज्यात १० वी ची परीक्षा रद्द झाल्या नंतर प्रथमच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे १० वीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून, यावर्षी राज्याचा १०विचा निकाल ९९.९५ टक्के लागला असून, यावर्षी अंतर्गत मूल्यमापन असताना देखील कोकण बोर्डाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकण बोर्डचा १०० टक्के एवढा निकाल लागला असून, राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
