मधुसूदन नानिवडेकर यांना कणकवली पत्रकार समिती उद्या श्रद्धांजली वाहणार

*💫कणकवली दि.१६-:* कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने ज्येष्ठ गझलकार तथा ज्येष्ठ पत्रकार मधुसूदन नानिवडेकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या शनिवार दिनांक 17 जुलै रोजी श्रद्धांजलीपर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वा. शहरातील तेलीआळी येथील भवानी हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार मित्र, सदस्य, कार्यकारणी सदस्य आजी-माजी जेष्ठ पत्रकार यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, सचिव संजय राणे, खजिनदार नितीन कदम व तालुका कार्यकारणीच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page