कोरोना रुग्ण वाढत असल्याने निर्णय:-मुख्याधिकारी जिरगे
*💫मालवण दि.१५-:* मालवण शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्यामुळे पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे व त्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून मालवण शहरातील सर्व व्यापारी व्यवसायीक भाजी विक्रेते मच्छीविक्रेते स्टॉलधारक संकुलातील दुकानदार या सर्वांनी RT-PCR तपासणी करुन घेणे बंधनकारक आहे, अशी माहिती मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मालवण शहरातील सर्व व्यापारी व्यवसायीक भाजी विक्रेते मच्छीविक्रेते स्टॉलधारक संकुलातील दुकानदार या सर्वांनी RT-PCR तपासणी नगरपरिषदेने नियुक्त केलेले पथक हे बाजारपेठ येथे बॉम्बे टेक्सटाईल दुकानाजवळ व नगरपरिषद कार्यालय नजीक अल्प बचत हॉल, मालवण नगरपरिषद येथील कोव्हीड-१९ लॅब येथे तपासणी केंद्रामध्ये सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ या कालावधीत RT-PCR तपासणी करुन घ्यावी. तसेच कोव्हीड-१९ चा प्रतिबंध करण्याकरिता सामाजिक अंतर, मास्कचा वापर व खबरदारीच्या इतर सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. RT PCR तपासणी दर १५ दिवसांनी करुन घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार मालवण शहरातील सर्व व्यापारी व्यवसायीक भाजी विक्रेते मच्छीविक्रेते स्टॉलधारक संकुलातील दुकानदार या सर्वांनी RT-PCR तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे यांनी केले आहे.
