Headlines

ऑलिंम्पिक खेळाडूंना शुभेच्छा देणाऱ्या ‘चिअर्स स्टँड’चे जिल्हाधिकाऱ्यांनी केले उद्घाटन

*💫कणकवली दि.१५-:* टोकीया ऑलिंम्पिक २०२० चे आयोजन २३ जूलै ते ५ सप्टेंबर २०२१ दरम्यान आयोजित करण्यात येणार असून यामध्ये भारत देशाचे १२६ खेळाडूंचे पथक सहभागी होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील दहा खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सदर खेळाडूंना प्रोत्साहन व शुभेच्छा देण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग मार्फत डिजीटल पोस्टर्स, व चेअर्स स्टॅन्डचे उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीम.के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीम. शुभांगी साठे,प्र.जिल्हा क्रीडा अधिकारी निनकसिंग बस्सी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी सिंध्दात रायकर, स्वप्निल देवळेकर,मंगेश माने आदी उपस्थित होते. सदर चेअर्स स्टॅन्ड जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग तसेच जिल्हयात विविध ठिकाणी या कार्यालयामार्फत ठेवण्यात येणार आहेत. तरी आपल्या राज्यातून सहभागी होणा-या आॅलंम्पियन खेळाडूंना प्रोत्साहन व शुभेच्छा देण्याकरीता जास्तीत जास्त नागरीकांनी, खेळाडूंनी व क्रीडा प्रेमीनी शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page