*💫कणकवली दि.१५-:* निसर्ग मित्रपरिवाराचे ज्येष्ठ सदस्य तथा विद्यमान सहसचिव चंद्रकांत उर्फ राजू जठार यांनी ‘जन्मदिवशी वृक्षारोपण’ या निसर्ग मित्रपरिवाराच्या अभिनव उपक्रमाला प्रतिसाद देत, विविध प्रकारच्या ५० फळ व फुलझाडांची लागवडीलायक रोपे निसर्ग मित्रपरिवारास भेट स्वरूपात उपलब्ध करून दिली. तळेरे दत्तमंदिर येथील ग्रामपंचायत अखत्यारीत असलेल्या उद्यान परीसरात प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षारोपण करण्यात आले. सदर वृक्षारोपण कार्यक्रमास निसर्ग मित्रपरिवाराचे जेष्ठ सल्लागार दादासाहेब महाडिक, शशांक तळेकर,अध्यक्ष संजय खानविलकर, उत्सवमूर्ती चंद्रकांत उर्फ राजू जठार, निलेश तळेकर, अक्षय मेस्त्री, राजेश माळवदे, प्रवीण वरुणकर, डॉ. अभिजित कनसे, ग्रामसेवक युवराज बोराडे, रोहन खानविलकर, आतिष जठार आदी व्यक्ती कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन करून उपस्थित होते.
निसर्ग मित्रपरिवाराकडून तळेरे दत्तमंदिर येथील ग्रा.पं. उद्यान परिसरात वृक्षारोपण’
