राणेंना केंद्रीय मंत्रीपद हा महाराष्ट्राचा सन्मान:अतुल काळसेकर

*💫कणकवली दि.१५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आणि आमचे मार्गदर्शक नारायण राणे तथा सर्वांचे लाडके दादा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात एम. एस.एम.ई. चे कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला.हा केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचा सन्मान आहे,अशी प्रतिक्रिया बँक संचालक अतुल काळसेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ना.नारायण राणे आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवातुन चांगल्या प्रकारे देशाला, पर्यायांने उपक्रमशील उद्योजकांना न्याय देऊ शकतील.त्यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग प्रणालीत जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय,फळप्रक्रिया व्यवसाय,पर्यटन व्यवसाय, खादी ग्रामोद्योग,व इतर लघु उद्योगाना आणि त्या अनुषंगाने व्यवसाय करु इच्छिणाऱ्या नव उद्योजकांना या खात्याच्या माध्यमातून मोठ्या संधी उपलब्ध होतील.केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर अभियानाला यामुळे खऱ्या अर्थाने गती प्राप्त होईल. ना.नारायण राणे यांच्या या खात्याचे मंत्रीपद ही आपल्या जिल्ह्यासाठी सुसंधी असल्याचे अतुल काळसेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page