दारू बाळगल्याप्रकरणी दोन युवकांना अटक

सावंतवाडी बसस्थानक येथे पोलिसांची कारवाई

*💫सावंतवाडी दि.१३-:* बेकायदेशीररित्या दारू बाळगल्याप्रकरणी सावंतवाडी बस स्थानक कडून २ युवकांना सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अनिल मंचुरिया ( वय ३३), अजय लालवाणी ( वय ४३) दोघेही रा. कोल्हापूर गांधीनगर हे दोघेही आज सावंतवाडी बस स्थानक येथे संशयित रित्या बसले होते. यावेळी त्यांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणून त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे असलेल्या बँग मध्ये एकूण ५० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई आज सकाळी ११ च्या सुमारास करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page