आ. सो. शेवरे जन्मदिनानिमित्त १५ जुलै रोजी डाॅ. सोमनाथ कदम यांचे व्याख्यान

*सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग संस्थेच्यावतीने आयोजन

*💫सावंतवाडी दि.१३-:* सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग या वाङमयीन संस्थेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिवर्तनवादी कवितेचे जनक आ. सो. शेवरे यांच्या जन्मदिनानिमित्त १५ जुलै रोजी लेखक, विचारवंत प्रा. डाॅ. सोमनाथ कदम यांचे ,आ सो शेवरेंच्या कवितेतील विचारदृष्टी’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. आ.सो.शेवरे यांनी आपल्या कवितेतून मराठी साहित्य विश्वात मान्यवर कवीगणांत स्थान मिळविले असून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिवर्तनवादी कवितेची रुजवात केली. त्यामुळे त्यांना परिवर्तनवादी कवितेचे जनक संबोधिले जाते. आ. सो. शेवरे यांचे गंधारीची फुले, दफणवेणा , झिरो बॅलन्स असलेलं माझ पासबुक आदी कवितासंग्रह प्रसिद्ध असून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. ‘सम्यक साहित्य संसद’ या वाङमयीन तर ‘विकास प्रबोधिनी’ या सामाजिक संस्थेची त्यांनी स्थापना केली असून ‘प्रसंवाद’ या अनियतकालिकाच्या माध्यमातून नव्या लिहित्या हातांना त्यांनी कायम प्रोत्साहित केले. त्यांच्या पश्चात सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने वाङमयीन व सामाजिक क्षेत्रात मौलिक कामगिरी करणार्‍या व्यक्तीचा ‘आ. सो. शेवरे जीवन गौरव पुरस्कार ‘ प्रदान करून उचित सन्मान केला जातो. आजवर राजा ढाले, ज. वी. पव‍ार यांना आ. सो. शेवरे जीवनगौरव पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. १५ जुलै या त्य‍ांच्या जन्मदिनी संस्थेने लेखक, विचारवंत प्र‍ा. डाॅ. सोमनाथ कदम यांचे आॅनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी आठवणीतील आबा’ या भागात कवयित्री संध्या तांबे व प्रसंवादचे संपादक इंजि. अनिल जाधव आ. सो. शेवरेंच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. कवी विठ्ठल कदम त्य‍ांच्या वाङमयीन व सामाजिक कार्याचा आढावा यावेळी घेणार आहेत. या आॅनलाईन व्याख्यानाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुनील हेतकर व कार्यवाह सिद्धार्थ तांबे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page