सायली कांबळी हिचा रेडी हायस्कूलने केला सत्कार

संगणकाच्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत प्रवेश मिळाल्याने सायलीवर अभिनंदनाचा वर्षाव

*💫वेंगुर्ले दि.१३-:* रेडी हायस्कूलची विद्यार्थिनी सायली कांबळी हिला संगणक क्षेत्रातील उच्चशिक्षणासाठी अमेरिका येथे प्रवेश मिळाल्याने रेडी हायस्कूल तर्फे तिचा सत्कार करण्यात आला. श्री माऊली विद्यामंदिर रेडी या प्रशालेतील माजी विद्यार्थिनी सायली राजेंद्र कांबळी हिने कॉम्प्युटर सायन्स ची गोवा राज्यात पदवी पर्यंतचे शिक्षण घेऊन तिने अ श्रेणी प्राप्त केल्याने. तिला संगणक क्षेत्रातील उच्च शिक्षण मास्टर्स इन अप्लाइड डाटा सायन्स या पदवीसाठी तिला अमेरिका येथील उच्च महाविद्यालय मध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल श्री माऊली विद्या मंदिर रेडी या प्रशाले तर्फे तिचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती सायली कांबळी, राजेंद्र कांबळी, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश शिरोडकर, अजित नाईक, शरद आपटे, चंद्रशेखर जाधव, सुधाकर आडेलकर, अनिल राणे, शांताराम जाधव,गोविंद चिपकर उपस्थित होते. रेडी परिसर तसेच रेड्डी हायस्कूल मधून मराठी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेऊन विदेशात उच्च शिक्षणासाठी जाणारी ही पहिलीच विद्यार्थिनी असल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.तसेच उपस्थितांनी कांबळीला शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले.

You cannot copy content of this page