शिवसेनेला धक्का;आम. नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत
*💫कणकवली दि.१३-:* भारतीय जनता पार्टीत पुन्हा इनकमिंग सुरू झाले आहे.वेंगुर्ले तालुक्यातील पेंडुर गावातील शिवसेना उपसरपंच प्रमोद शिरोडकर यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.या प्रवेशाने वेंगुर्ले तालुक्यात शिवसेनेला जोरदार धक्का मिळाला आहे. उपसरपंच प्रमोद शिरोडकर यांच्यासह लिंगेश्वर नाईक,वसंत शिरोडकर, आर्यन मागवकर यांनी भाजपात प्रवेश केला.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्न देसाई,तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर तालुका उपाध्यक्ष संतोष गावडे, ग्रामकमिटी अध्यक्ष उमेश सावंत, किसान मोर्चाचे बाळू प्रभू, मातोंड सोसायटीचे व्हाईस चेअरमन नारायण नाईक,युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष दाजी वैद्य,युवा मोर्चाचे गोट्या तांडेल,विकी राऊत आदी उपस्थित होते.गावाच्या विकासासाठी भाजपा पक्षात राहून राणेंच्या नेतूत्वाखाली काम करणे महत्वाचे आहे.गावचे अनेक प्रश्न खोळबलेले आहेत. ते भाजपा पक्ष सोडवेल असा विश्वास उपसरपंच शिरोडकर यांनी व्यक्त केला.
