*💫वैभववाडी दि.०८-:* सत्य शोधक जण आंदोलन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदार वैभववाडी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छडले आहे.त्याची तीव्रता आणि व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे.करोडो शेतकरी राजधानी दिल्लीत धडकले आहेत.शेती हा विषय केंद्र व राज्य यांच्याशी संबंधित असा आहे. कायदे करतांना राज्यांना विचारात घेतलेले नाही.तसेच राज्य सभेमध्ये कायद्यांना मंजुरी मिळविताना वैधानिक विचारणा हरताळ भासण्यात आला.निवेदनात प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.केंद्र सरकारने तिन्ही शेतकरी हिता विरोधी केलेले काळे कायदे तत्काळ रद्द करावेत.कृषी बाजार समित्या अधिक बळकट कराव्यात.स्वामिनाथन आयोगाच्या हमी भावा संदर्भात असलेल्या शिफारशी लागू कराव्यात,केंद्र सरकारने या पुढे कृषि विषयक कायदे करतांना राज्य सरकारांना विचारात घेऊन सल्लामसलत घ्यावी,त्या नंतरच कायद्याला अंतिम स्वरूप द्यावे.असे निवेदनात म्हटले आहे.8 डिसेंबर च्या शेतकरी आंदोलनास पाठींबा दिला आहे.या वेळी राजेंद्र कांबळे,अंकुश कदम,रमेश सकपाळ,योगेश सकपाळ,किशोर सकपाळ यांनी नायब तहसीलदार अशोक नाईक यांना निवेदन दिले.
सत्य शोधक जन आंदोलन, सिंधुदुर्ग च्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन
