खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे;तिन जागा रिक्त असल्याने आरोग्य विभागावर ताण
*💫कणकवली दि.०८-:* कणकवली तालूक्यातील नांदगाव येथे दोन दिवसापूर्वी कोरोनाने पहीलाच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. नागरीकांनी सतर्क राहून खबरदारी घेणे आज काळाची गरज बनली असून ज्या नागरीकांना कोरोना संदर्भात लक्षणे आढळून आल्यास त्यांनी त्वरीत आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन नांदगाव आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे . दरम्यान आजही नव्याने रूग्णांची नोंद झाली असून इतर सर्व रूग्ण होम कॉरंटाईन मध्ये असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले . नांदगाव व असलदे येथे जुलै ते ऑगस्ट दरम्यान २७ कोरोना रूग्णांची नोंद झाली होती .यातील सर्व कोरोना मुक्त झाले होते .म्हणून येथील जनतेने सुटकेचा निश्वा:स सोडला होता .मात्र पुन्हा एकदा कोरोना मुक्त झालेले नांदगाव गेल्या पाच ते सहा दिवसापासून कोरोनाचे पॉझीटीव्ह रूग्ण पुन्हा मिळायला लागले असून यातील दोन दिवसापूर्वीच नांदगाव येथील रूग्णाचे जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाल्याने खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे . या वाढत्या रूग्णामुळे चालू झालेल्या माध्यशाळेलाही सुट्टी देण्यात आली आहे .ज्या कोरोनाच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेतले जात असून कोणाला लक्षणे आढळल्यास तसेच संपर्कात अजून कोणी व्यक्ती आले असतील त्यांनी घाबरून न जाता त्यांनी त्वरीत नांदगाव प्राथमिक आरोग्य केद्र येथे संपर्क त्यांनी त्वरीत आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा तसेच सामाजीक अंतर ठेवणे , सार्व ठीकाणी तसेच गर्दीच्या ठीकाणी मास्कचा वापर करणे काही लक्षणे आढळल्यास त्वरीत आरोग्य केंद्राशी संपर्क करावा असे आवाहन नांदगाव