मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. पेडणेकर यांची वेंगुर्ला नगरपरिषदेला भेट

*💫वेंगुर्ला दि.०६-:* वेंगुर्ला येथे ‘सिधुस्वाध्याय‘ प्रकल्प होण्यासाठी मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर यांनी नगरपरिषदेच्या कॅम्प येथील जागेसंदर्भात तसेच याठिकाणी इमारत पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात काही कालावधीसाठी नगरपरिषदेचे पर्यटन सुविधा केंद्र (निसर्ग रिसॉर्ट) उपयोगात आणण्यासंदर्भात चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी आज भेट घेतली. प्रत्यक्ष जागेवर जाऊन या दोन्ही गोष्टींचा त्यांनी आढावाही घेतला. यावेळी त्यांच्या समवेत नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे, जे.जे.स्कुल ऑफ आर्टचे सुनील नांदोस्कर, युनिव्हर्सिटीचे सिनेट सदस्य श्री गणेश, नगरसेवक प्रशांत आपटे आदी उपस्थित होते. दरम्यान, याबाबत विचार विनिमय करण्यासाठी यांच्या ७ जुलै रोजी कुलगुरू डॉ.पेडणेकर, आमदार दीपक केसरकर यांच्यासोबत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे बैठक आयोजित केली आहे. कुलगुरू पेडणेकर यांनी नगरपरिषदेच्या कलादलनाला भेट देऊन ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपल्याबद्दल गौरवोद्गारही काढले.

You cannot copy content of this page