मालवणात भाजपाचा बैठकांवर जोर

पक्ष संघटना व विकासात्मक मुद्दे यावर होतेय चर्चा;८ जुलै पर्यंत नियोजन

मालवण दि प्रतिनिधी पक्ष संघटन व विकासात्मक कामे या विषयांवर चर्चा आणि आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक या विषयावर चाचपणी साठी दि ८ जुलै पर्यंत प्रत्येक जि. प. मतदारसंघात भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे दि ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सुकळवाड, दुपारी ३ वाजता पेंडुर, ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता देवबाग येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे बैठकीत जिल्हा व राज्य स्तरावरील पदाधिकारी उपस्थित असतील सर्व शक्ती केंद्रप्रमुख, सर्व विभागीय अध्यक्ष, सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच किंवा उपसरपंचांनी या समांना उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी म्हटले आहे..

You cannot copy content of this page