*💫सावंतवाडी दि.०६ -:* सावंतवाडी तालुक्यात आज २२ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १० तर ग्रामीण भागात १२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात सालईवाडा ४, न्यू खासकीलवाडा ३, सावंतवाडी १, माठेवाडा २ तर ग्रामीण भागात माडखोल १, वेत्ये १, माजगाव ४, बांदा ४, नेमळे २ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात २४९ रुग्ण सक्रिय आहेत.
