तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिले निवेदन
*💫सावंतवाडी दि.०६-:* भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करणाऱ्या महाआघाडी सरकारचा सावंतवाडी तालुका भाजपच्या वतीने मंगळवारी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन सादर करत जाहीर निषेध करण्यात आला आहे. सावंतवाडी येथील तहसीलदार कार्यालयात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची आज भाजप सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ भेट घेतली व शासनाने केलेल्या या निलंबनाबाबत निवेदन देऊन निषेध नोंदविला. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महावसुली आघाडी राज्य सरकारने तालिबानी पद्धतीने, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षभरासाठी निलंबन केले आहे. जनतेच्या कोणत्याही प्रश्नांना न्याय न देता भोंगळ पद्धतीने सरकारचा कारभार चाललेला आहे. लोकशाहीत जनतेच्या मनातील राग व्यक्त करण्याचा अधिकार विरोधकांना असतो, पण लोकशाहीच्या संकेतांचे पालनही या सरकारला करता आलेले नाही. सभागृहात जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटू नये केवळ यासाठीच अशा अशोभनीय कृतीचा आधार या पळपुट्या सरकारने घेतला आहे. या सरकारचा निषेध आम्ही या निवेदनाद्वारे करत आहोत. आमचे हे निवेदन जनतेशी कसलेच सोयरसुतक न राहिलेल्या या महाविकास आघाडीच्या सरकारपर्यंत जसेच्या तसे पोहोचवावे, अशी विनंती या निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्या कडे करण्यात आली आहे. यावेळी भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित,
