मतदार यादी छायाचित्र समावेशासाठी मुदतवाढ द्या

कणकवली तालुका भाजपची तहसीलदारांकडे मागणी

*💫कणकवली दि.०६-:* कणकवली तालुक्यातील मतदार यादीतील काही व्यक्तींची नावे छायाचित्र नसल्यामुळे मतदारयादीतून कमी करण्यात येणार आहेत. कोव्हिड १९ च्या पार्श्वभूमीवर संबंधित मतदार हे मतदार नाव व छायाचित्र नोंदणीसाठी वंचित राहू शकतात. संबंधित व्यक्तींची नावे मतदारयादीतून कमी करण्यात येणार असल्याची प्रसिद्धी आपल्याकडून ग्रामीण भागामध्ये झाली नसल्याने तसेच आपण दिलेली मुदतवाढ ही पुरेशी नसून सदर व्यक्तींची नावे पुन्हा मतदारयादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी अजून मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी कणकवली तालुका भाजपाच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, नगराध्यक्ष समीर नलावडे, प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवण, माजी सभापती दिलीप तळेकर, महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, सोनू सावंत, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक मेघा गांगण, शिशिर परुळेकर, परशुराम झगडे, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, सोनू सावंत, स्वप्निल चिंदरकर, कळसुली उपसरपंच सचिन पारधीये, विजय चिंदरकर, संतोष पुजारे, बाळा पाटील, समर्थ राणे, प्रसाद देसाई आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page