Headlines

मनसेच्यावतीने सुरु असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्ग पाहणी दौऱ्याची झाराप येथे सांगता

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाने योगेश चिले मनिष पात्रे, नंदू गाडी यांनी केली पाहणी

*💫कुडाळ दि.०६-:* मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत असलेल्या जनतेच्या अनेक तक्रारींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाने पक्षाच्या रस्ते – साधन सुविधा व आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष योगेश चिले मनिष पात्रे, नंदू गाडी आदी पदाधिकाऱ्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला. गेले दोन दिवस पनवेल ते झाराप दरम्यान मनसेच्यावतीने सुरु असणाऱ्या या पाहणी दौऱ्याची सांगता झाराप येथे करण्यात आली. यावेळी कुडाळ जिल्हाध्यक्ष धीरज परब, दया मेस्त्री, जगन्नाथ गावडे, रामा नाईक, सुबोध परब, प्रथमेश धुरी, सिध्दांत बांदेकर, आदिल शहा, विष्णू मस्के, राहील शहा आदी उपस्थित होते. मुंबई-गोवा महामार्ग हा सिंधुदुर्ग मधून गोवा राज्याला जोडला जाणार आहे. कोकणवासीयांच्या व पर्यटनाच्या दृष्टीने हा महामार्ग खूप महत्त्वाचा आहे. मात्र या रस्त्याबाबत त्याच्या कामाबाबत स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रारी केल्या. राजकीय पक्षांनी सामाजिक संस्थांनी आंदोलने छेडली. अनेक लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आज हायवे अॅथोरिटी टोल सुरू करण्याच्या घाईगडबडीत आहे. परंतु हायवेच्या खचलेल्या भागाविषयी, बॉक्स वेलच्या चुकीच्या बांधकामाविषयी, कोसळलेल्या ब्रीच विषयी, चुकीचे कट, सर्कल विषयी, चुकीच्या डायग्रॅमविषयी कंपनी ठेकेदार गप्प आहेत. जनतेच्या पैशाच्या चुराड्यातुन होणाऱ्या प्रकल्पाबाबत आमदार-खासदार तोंड उघडत नाहीत. अशा अनेक जनतेच्या तक्रारीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाने योगेश चिले मनिष पात्रे, नंदू गाडी आदींनी हा पाहणी दौरा केला. या प्रसंगी लोकांच्या समस्या व कामातील त्रुटी याच्या नोंदी घेतल्या गेल्या. भविष्यात राज ठाकरे यांच्या आदेशाने या सर्व बाबींविषयी आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असे योगेश चिले यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page