विज बिल माफिसाठी बहुजन मुक्ती पार्टीचे कंदील भेट आंदोलन

*तहसीलदार म्हात्रे यांना निवेदन देऊन कंदील दिला भेट*

*💫सावंतवाडी दि.०६-:* महाराष्ट्र मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे जनता संकटात सापडली आहे. त्यामुळे राज्य सरकारने थकित वीज बिल माफ करावे आणि नवीन बिल योग्य रित्या करावी यासाठी आज सावंतवाडी शहरात बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली कंदील भेट आंदोलन करण्यात आले असून, यावेळी गांधी चौकात वीजबिलाची होळी करून निषेध करण्यात आला आहे. यावेळी तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले असून कंदील भेट देण्यात आला आहे. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष लाडू जाधव, संकेत कुडाळकर, प्रतिक जाधव, तुषार कदम, अनिकेत जाधव, राजू कदम, संजय आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page