Headlines

कथाकथन आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मालवण शाखेने केले होते आयोजन

मालवण दि प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, मालवणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन बाल कथाकथन आणि सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मुलांची वाचनाची ओढ वाढावी, त्यांच्या वकृत्व कलेचा विकास व्हावा आणि एक संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा मालवणच्या वतीने मालवण तालुकास्तरीय ऑनलाईन बाल कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहिली ते दुसरी, तिसरी ते पाचवी आणि सहावी ते आठवी या तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटात प्रथम पाच विजेते स्पर्धक निवडण्यात आले आहेत. या स्पर्धेचा गटनिहाय पहिले पाच विजेते पुढील प्रमाणे (गट क्र. १ पहिली ते दुसरी) ईश्वरी योगेश गावडे- सुकळवाड, श्रेयस राजेंद्र चौधरी- कुंभारवाडी, अथर्व आत्माराम नांदोसकर संयुक्त मोगरणे, शांभवी नातेवाड कुंभारमाठ, उर्वी उमेश खराबी मसुरे नं. १. (गट क्र. २- तिसरी ते पाचवी) किंजल आनंद परब भगवंतगड, मानसी दीपक पेडणेकर मसुरे नंबर १, आर्या शंकर गुराम गुरामवाड नं. १, उदय वासुदेव साटम- त्रिंबक साटमवाडी, संस्कार संभाजी पवार- चिंदर सडेवाडी (गट क्र. 3 सहावी ते आठवी) दीप्ती हरिश्चंद्र गावकर- शिरखंडे नं. १, छाया संतोष गुडेकर कुंभारमाठ, आबाजी अमित गावडे संयुक्त मोगरणे, अभिषेक अनिल मेस्त्री- मसुरे नं. १, ललिता जितेंद्र धुरी राठीवडे नं. १ *सुंदर हस्ताक्षर स्पर्धा निकाल* प्रत्येकाच्या जीवनात सुंदर हस्ताक्षराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सुंदर हस्ताक्षर हा एक दागिना आहे. नीटनेटके, सुंदर, सुवाच्च व वळणदार अक्षर रेखाटणे ही एक कला आहे. मुलांच्या हस्ताक्षराचे कौतुक व्हावे, या उद्देशाने प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा पहिली, दुसरी ते तिसरी, चौथी ते पाचवी आणि सहावी ते आठवी अशा चार गटात घेण्यात आली. या स्पर्धेतील प्रथम पाच विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे (गट क्र. १ पहिली ) – स्वप्नाली नागेश विरकर- चिंदर सडेवाडी, लिखित दिशांत पडवळ- चिंदर नागोचीवाडी, गार्गी राजेंद्र मोर्वेकर कट्टा नं. १, जान्हवी संतोष नांदोसकर संयुक्त मोगरणे, अक्षत सचिन तोंडवळकर- वेरली (गट) क्र. २ दुसरी ते तिसरी) – वेदा प्रवीण मराठे संयुक्त मोगरणे, निधी सूर्यकांत चव्हाण नांदोस सारंगवाडा, भार्गवी गिरीश आळवे वराड देउळवाडी, विदिशा नागेश साटम त्रिंबक साटमवाडी, पायल भाऊ घाडीगावकर मठ (गट क्र. ३ चौथी ते पाचवी) विशाखा विश्वनाथ बिरमोळे- मालवण धुरीवाडा, यशश्री गुरुनाथ ताम्हणकर मसुरे नं. १ विघ्नेश सत्यविजय कुंभार- कांदळगाव नं. १, प्रथमेश अनिल कोकम साळेल नं. २ शांभवी तुकाराम कांबळी- आंबेरी नं. १ (गट क्र. ४ सहावी ते आठवी) श्रावणी कमलेश चव्हाण संयुक्त मोगरणे, हिना दिपक म्हापणकर देवली काळेथर, शुभवाणी शिवराम मसुरकर मसुरे नं. १, वेदांत राजाराम परब मसुरे नं. १ प्राजक्ता सत्यवान सावंत देवली वरची. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राथमिक शिक्षक समिती अध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर, स्पर्धा प्रमुख बाळकृष्ण नांदोसकर, प्रायोजक श्रीकृष्ण सावंत यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page