*💫कणकवली दि.०४-:* खारेपाटण दशक्रोशीत कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या खारेपाटण रामेश्वर नगर येथील कोविड केअर सेंटरला दक्षिण मुंबई युवक काँग्रेसचे सरचिटणीस, दि म्युनिसिपल को. ऑप. बँकेचे संचालक विलास कृष्णा साळुंके यांचे सुपुत्र, युवा सामाजिक कार्यकर्ते विनय विलास साळुंके यांनी भेट देऊन सरपंच रमाकांत राऊत यांच्याकडे १०,०००/- ची आर्थिक मदत केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटणकर, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संतोष पाटणकर, राजेंद्र साळुंके, इमरान अन्सारी, गौरव साळुंके, साक्षांत साळुंके, सर्वेश साळुंके, तनय कांबळे आदी मान्यवर मंडळी उपस्थीत होती. कोविड केअर सेंटरसाठी हॅन्ड ग्लोजचीही लवकरच देण्याचे आश्वासन यावेळी विनय साळुंके यांनी दिले. विनय साळुंके यांनी केलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल सरपंच रमाकांत राऊत यांनी आभार व्यक्त केले असून, खारेपाटण ग्रामस्थांमध्येही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
विनय साळुंके यांच्याकडून खारेपाटण कोविड सेंटरला आर्थिक मदत
