आता लसीकरणकेंद्रावर उपस्थित असलेल्यांनाच कुपनद्वारे लसीकरण

मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बालाजी पाटील यांची माहीत

*💫मालवण दि.०४-:* सध्या मालवण शहरातील लसीकरण केंद्रावर उपलब्ध डोसपेक्षा जास्त लाभार्थी अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने लाभार्थ्यांना लसीकरणाशिवाय माघारी पाठवावे लागत आहे. त्यामुळे मालवण ग्रामीण रुग्णालयाकडून आजपासून फोनद्वारे किंवा प्रत्यक्षात नोंदणी करून घेणे तसेच नोंदणी केलेल्या नागरिकांना फोन करून लसीकरणास बोलाविणे हे बंद करण्यात येत आहे. यापुढे लसीकरणाच्या ठिकाणी जे लाभार्थी उपस्थित राहतील त्यांना उपलब्ध डोसनुसार कुपन देऊन लसीकरण केले जाणार असल्याची माहिती मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात पत्रकार परिषद झाली. आजपर्यंत ग्रामीण रुग्णालयाकडून फोनद्वारे किंवा प्रत्यक्षात १७५१ नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली. त्या नागरिकांना लसीकरणाच्या आदल्या दिवशी किंवा लसीकरणाच्या दिवशी जेवढी लस उपलब्ध असेल त्यानुसार नागरिकांना बोलविले जात होते. आतापर्यंत पंधराशेहून अधिक नागरिकांना फोन लावण्यात आले. काही नागरिकांना नेटवर्क प्रॉब्लेममुळे फोन लागले नाहीत. आता शासनाच्या नवीन मार्गदर्शक सुचनेनुसार ५० टक्के ऑनलाईन व ५० टक्के ऑफलाईन नोंदणी होत असल्याने तसेच सेशनमध्ये ऑनलाईन, ऑफलाईन पहिला व दुसरा डोसची क्षमता ही प्रत्यक्ष लसीकरणाच्या दिवशी लॉगीन केल्यानंतर समजते. त्यामुळे आदल्या दिवशी फोनद्वारे बोलाविलेली माणसे तसेच ऑन दी स्पॉट रजिस्ट्रेशनसाठी येणारे लाभार्थी यांच्यामुळे उपलब्ध डोसपेक्षा जास्त लाभार्थी अशी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे आता ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने नागरिकांना फोनद्वारे लसीकरणासाठी बोलविणे बंद करण्यात आले आहे. आता येथील केंद्रावर कोव्हीशिल्ड, कोव्हॅक्सीन लस ज्या प्रमाणात उपलब्ध होईल त्यानुसार ऑनलाईन रजिस्ट्रेशनद्वारे तसेच लसीकरण केंद्रावर जे नागरिक लस घेण्यास उपस्थित असतील अशा नागरिकांना डोसच्या उपलब्धतेनुसार सकाळी आठ वाजता ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने कुपन दिले जाणार आहे. ४५ वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाणार आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण असताना ऑनलाईन किंवा ऑफलाईन रजिस्ट्रेशन करून लसीकरण करून घ्यायचे आहे. उपलब्ध लस आणि लाभार्थी नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईनची क्षमता संख्या ही जिल्हास्तरावरून निश्‍चित होते. त्यात बदल करण्याचे अधिकार हे जिल्हास्तरावरूनच होतात. येथील ग्रामीण रुग्णालय त्यात बदल करू शकत नाही असेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page