जॅक सुटल्याने बोट अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

*💫मालवण दि.०३-:* कर्ली खाडी पात्रालगतच्या किनाऱ्यावर सुरक्षित स्थळी असलेल्या एका खासगी हाऊस बोटीच्या कामाच्या वेळी बोटीला लावलेला जॅक निसटल्याने हाऊसबोट अंगावर पडून झालेल्या दुर्घटनेत मालवण धुरीवाडा येथील संतोष सूर्यकांत सारंग (वय ४४) यांचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना आज शनिवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांच्यासह पोलीस सुधीर कदम, हवालदार नाईक, पाटकर आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याबाबत मृत संतोष यांचे भाऊ नामदेव सूर्यकांत सारंग यांनी निवती पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. मालवण धुरीवाडा येथील रहिवासी असणारे संतोष सारंग हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, पुतणी असा परिवार आहे.

You cannot copy content of this page