जिल्हाध्यक्ष बाळा गावडेंचे उपस्थित राहण्याचे आवाहन
*💫सावंतवाडी दि.०३-:* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार राबविण्यात येणाऱ्या महत्त्वांच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची अत्यंत महत्त्वाची व तातडीची बैठक ओरोस जिल्हा काँग्रेस कार्यालयात सोमवार दिनांक ५ जुलै रोजी सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, सर्व तालुका अध्यक्ष, महिला काँग्रेस, एन एस यू आय व सर्व सेलचे पदाधिकारी व सदस्य आदींनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केले आहे.
