संकटमोचक माणूस, राणेंचा सच्चा कार्यकर्ता म्हणजे सुधीर आडीवरेकर

कोरोना काळात शहरवासियांची काळजी घेणारा नगरसेवक

*💫सावंतवाडी दि.०४ प्रसन्न गोंदावळे-:* संकट काळात मदतीला धावणारा माणूस अशी ओळख असणाऱ्या सुधीरभाई आडीवरेकर यांचा आज वाढदिवस. ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलने त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा घेतलेला आढावा माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, माजी राज्यमंत्री आ. रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आम नितेश राणे यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर सावंतवाडीच्या जनतेन प्रचंड मतांनी त्यांना निवडून दिल. मतदारांनी दाखविलेले प्रेम सार्तकीलावत मिळालेल्या संधीच सोन त्यांनी केल. सर्वसामान्य कार्यकर्ता, शिवसेना शाखाप्रमुख, युवक कॉंग्रेस अध्यक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान शहराध्यक्ष, नगरसेवक ते आरोग्य व क्रीडा सभापती, असा थक्क करणारा त्याचा राजकीय प्रवास हा थक्क करणारा आहे. नगराध्यक्ष संजू परब यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत संजू परब यांचा मागे हक्काची वोट बँक म्हणून ते उभे राहिले. त्यांसंजू परब यांच्या विजयात सुधीरभाईचा मोठा वाटा आहे. संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात असताना शासनाच्या मदतीची वाट न पाहता हा नेता मैदानात उतरला. लोकांसाठी अहोरात्र झटला. त्यांच्या याच धडाकेबाज कार्यामुळे त्यांची आरोग्य व क्रीडा सभापतीपदावर बिनविरोध निवड करण्यात आली. कोरोनाच्या काळात आरोग्य सभापती म्हणून ते झटत आहेत. याच बरोबर नगरसेवक म्हणून वॉर्डमधील विकासकामांचा धडाका त्यांनी लावला आहे. सावंतवाडीच्या विकासासाठी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासोबत ते मेहनत घेत आहेत. दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी ते अग्रक्रमी असून दिला शब्द पाळणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात. चार वर्षात भल्याभल्यांना जे शक्य झाल नाही ते या नेत्यान चार दिवसांत करून दाखवल आहे. नगराध्यक्ष संजू परब यांच्या खांद्याला खांदा लावत ते शहर विकासासाठी मेहनत घेत आहेत. दिलदार स्वभाव, रुबाबदार राहणीमान आणि सामाजिक कार्याची ओढ यामुळे त्यांनी युवकांच्या हृदयात जागा निर्माण केली आहे. त्यांच्या या स्वभावामुळेच ते प्रत्येकाला आपलेसे वाटतात. दिलेला शब्द पाळणाऱ्या या धडाकेबाज नेतृत्वास ग्लोबल महाराष्ट्र न्युज चॅनेलकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा व त्यांच्या कार्यास प्रणाम

You cannot copy content of this page