डॉक्टर्स डे निमित्त रोटरी क्लबचा उपक्रम
*💫सावंतवाडी दि.०३-:* 1 जुलै म्हणजे रोटरीच्या नव वर्षाची सुरवात. ताज्या दमाच्या नव्या नेत्रुत्वाने हाती कारभार स्विकारल्याचा हा काळ. त्यात “डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकाऊटंट्स डे” म्हणजे बहारच. त्यात अलिकडच्या काळात तर हा दिवस नक्कीच खास आहे. कारण कोरोना महामारीच्या या काळात डॉक्टर्सनी जीवावर उदार होऊन लाखो जीवाना जीवनदान मिळवून दिले. अर्थात डॉक्टर्स सोबत परिचारीका आणि इतर सहाय्यक वर्ग ही आलाच. पण 1 जुलै हा डॉक्टर्स डे असल्याने रोटरी क्लब, सावंतवाडीनी क्लब मधील जेष्ठ डॉ.अजय स्वार आणि माजी आणि जेष्ठ रो.चंद्रकांत जेवरे यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सकाळी 11 वा.एका छोटेखानी कार्यक्रमात नुतन अध्यक्ष-रो.साईप्रसाद हवालदार, सचिव रो.CA.सुधीर नाईक आणि खजिनदार रो.आनंद रासम या त्रिमुर्तीनी गणपतीची पुजा करुन नववर्षाला सुरवात केली. यावेळी रो. डॉ.महेश जोशी, रो.डॉ.अभिजित वझे, फिजिओथेअरपीस्ट डॉ.रुक्विया-खान तर चार्टर्ड अकाऊटंट्स डे असल्याने रो.CA.सुधीर नाईक यांचा सत्कार केला. यानिमित्याने माजी सचिव रो.दिलीप म्हापसेकर आणि माजी खजिनदार रो.वसंत करंदीकर यांचा सत्कार करण्यात आला. आणि 2020-21 वर्षात अध्यक्ष रो.डॉ.राजेश नवांगुळ आणि टीमने केलेल्या रेकाॕर्ड ब्रेक कामगिरीचे कौतुक करण्यात आले. यावेळी जेष्ठ रो.अनंत उचगावकर, रो.रमेश भाट, रो.वसंत करंदीकर, रो.वल्हभ नेवगी, डॉ.महेश जोशी यानी मागिल टीमच्या कार्याचे कौतुक केले आणि नुतन टीमला शुभेच्छा दिल्या. यावेळी रो.प्रमोद भागवत, रो.सत्यजित धारणकर, रो.सुमंगल कालेकर आणि रो.राजेश रेडिज उपस्थितीत होते. त्यानंतर शहरातील प्रतिथयश मेडीकल सुप्रिटेंडट डॉ.उत्तमराव पाटील, रो.डॉ.अभिजित चितारी, डॉ.सुबोधन कशाळीकर, रो.डॉ.रेवणसिद्धा खटावकर, रो.डॉ.राघवेंद्र तळेगावकर,डॉ.सतिश सावंत, डॉ.सौ.शुभदा करमळकर, डॉ.सौ.अश्विनी खानोलकर, रो.डॉ. स्नेहल गोवेकर, डॉ.मिलीद खानोलकर, रो.विनया बाड, रो.डॉ. राजेश नवांगुळ, CA.सुशिल मोडक, CA सौरभ भागवत, इत्यादी चा सत्कार करण्यात आला. तसेच कृषी दिनाचे औचित्य साधून बांदा येथील यांचा सत्कार करण्यात आला.
