सौ विनंती केसरकर;कणकवली कॉलेजमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन
*💫कणकवली दि.०३-:* कोरोना वैश्विक महामारी च्या काळामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे त्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वच्छता पाळणे व स्वतःला निरोगी ठेवणे आवश्यक आहे असे मत एच. पी. सी. एल. मुंबई, मुख्य प्रबंधक, सौ विनंती केसरकर यांनी व्यक्त केले. एच पी सी एल, मुंबई कणकवली कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांचेमार्फत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमासाठी प्रभात कुमार ,सुशांत जाधव अधिकारी एचपीसीएल, भोपाळ विभाग, प्राचार्य डॉ. राजेंद्र कुमार चौगुले कणकवली कॉलेज कणकवली हे उपस्थित होते. प्रसंगी मार्गदर्शन करताना सौ विनंती केसरकर म्हणाल्या की, कोरोनाचे संकट टाळण्यासाठी शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक. या वैश्विक महामारी च्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सर्वांनी पाणी, घर, व परिसर स्वच्छ ठेवावे असे मत त्यांनी व्यक्त केले. प्राचार्य चौगुले यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल सौ विनंती केसरकर व एचपीसीएल यांचेमार्फत गरजू विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक यांचे तर्फे एच पी सी एल चे ऋण व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या आयोजनापूर्वी “ स्वच्छ भारत मिशन “ संदर्भात जनजागृतीसाठी प्रश्नमंजुषा घेण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख प्रा डॉ .बी. एल. राठोड, राष्ट्रीय सेवा योजना प्रा एस. बी. पाटील कार्यालय मुख्य लिपिक संजय ठाकूर, कार्यालय कर्मचारी यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी १११ विद्यार्थी सहभागी होते. कार्यक्रमाध्ये मान्यवरांचे आभार कार्यालयीन लिपिक मंगेश आरेकर यांनी मानले.
