व्यापाऱ्यांसह करंट खातेदारांना मिळणार दिलासा
*💫कणकवली दि.०३-:* भारतीय स्टेट बँकेच्या ६६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कणकवली शाखेमध्ये ‘ करंट अकाउंट सर्व्हिस पॉईंट’चे उद्घाटन सहाय्यक महाप्रबंधक प्रशांत जोशी यांच्या हस्ते फित व केक कापून करण्यात आले . यावेळी मुख्य प्रबंधक लक्ष्मण सरंबळकर , रिलेशनशीप मॅनेजर अक्षय पाटील , मुख्य सहयोगी रवी परब , शाखा प्रबंधक श्री . डोंगरे तसेच नरेश सावंत , गणेश राणे , गुरुनाथ पावसकर तसेच करंट अकाउंटचे ग्राहक व इतर मान्यवर उपस्थित होते . भारतीय स्टेट बँकेच्या ६६ व्या वर्धापन दिवस देशभरातील सर्व शाखांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला . प्रायव्हेट बँकांप्रमाणे कोणताही भेदभाव न करता भारतातील खेड्यापाड्यापर्यंत गोरगरिबांपर्यंत बँकिंग सेवा देऊन अग्रणी बँकेची भूमिका स्टेट बँक उत्तमरित्या यशस्वीपणे पार पाडत आहे आणि सर्व शासकीय योजना बँकांच्या शाखांमधून राबवल्या जात आहेत . नेट बँकिंग , मोबाईल बँकिंग , योनो अॅप या आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण सेवा आपल्या ४५ कोटी ग्राहकांना देण्यात स्टेट बँकेने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे . कोरोना सदृश्य परिस्थितीत सुद्धा ग्राहकांना अविरत अखंड सेवा कशी देता येईल , याचे सर्वतोपरी प्रयत्न स्टेट बँक करीत आहे . यासाठी बँकेने स्थापित केलेले सीएसपी ( ग्राहक सेवा केंद्र ) उल्लेखनीय ग्राहक सेवा देत आहेत प्रशांत जोशी म्हणाले , चालू खाते ग्राहकांसाठी ( व्यापारी वर्ग ) मार्गदर्शन व सेवा देण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे . करंट अकाउंट सर्व्हिस पॉईंटमुळे मोठे व्यापारी व दुकानदार वर्ग यांना तत्पर व जलद बँकिंग सेवा मिळणे शक्य होणार आहे . बँकेच्या आधुनिक ऑनलाईन बँकिंग सुविधेचा लाभ घेण्यास उद्युक्त करता येईल . कणकवली शहरातील व्यापारी वर्गाने या सेवेचा लाभ घ्यावा , कणकवली शाखेत अक्षय पाटील ( ७७ ९ ८ ९ ८०५४२ ) यांची रिलेशनशीप मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . त्यांच्याकडे सर्व जुन्या – नव्या चालू ग्राहक खात्यांना जलद सेवा मिळण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे श्री . सरंबळकर यांनी सांगितले . रवी परब यांनी आभार मानले .
