माजी केंद्रीय मंत्री, खासदार सुरेश प्रभू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आयोजन
*💫सावंतवाडी दि.०३-:* कोकणचे सुपुत्र व माजी केंद्रीय मंत्री, खासदार सुरेश प्रभू यांच्या जन्मदिनाचे (११ जुलै) औचित्य साधून सावंतवाडी येथील अटल प्रतिष्ठानच्यावतीने ध्वनिमुद्रित प्रणालीद्वारे खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या सुमारे दीड वर्षांहून जास्त काळ कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीमुळे निर्माण झालेले अनेक सामाजिक आर्थिक प्रश्न अशा निराशाजनक परिस्थितीतही शासन आणि अनेक सामाजिक संस्था आपल्या परीने या राष्ट्रीय आपत्तीवर मात करण्यासाठी काम करत आहेत. अशावेळी या कठीण प्रसंगी काही सुखद घटनाही घडल्या आहेत, ज्या समाजाला सकारात्मक विचार करायला लावतात. या अनुषंगाने सुरेश प्रभू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून अटल प्रतिष्ठानने या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘बी पॉझिटिव्ह अर्थात कोरोना काळात मला आलेला सुखद अनुभव’ हा स्पर्धेचा विषय असून स्पर्धकांनी जास्तीत जास्त पाच मिनिटांचा व्हिडिओ १५ जुलैपर्यंत जिजाऊ वाचनालय माठेवाडाचे व्यवस्थापक विश्वनाथ सनाम-९६५७१८१६८९ यांच्याशी संपर्क साधून पाठवायचा आहे. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्रक, विजेत्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर व कार्यवाह डॉ चंद्रशेखर कार्लेकर यांनी केले आहे.
