मातोंड येथील शाळा न.०१ मध्ये विलगिकरण कक्षाची स्थापना

सरपंचाच्या हस्ते लोकार्पण

*💫वेंगुर्ले दि.०३-:* तालुक्यातील मातोंड येथे कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत मातोंडच्या वतीने येथील शाळा नंबर १ च्या सभागृहात कोरोना विलगिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याचे लोकार्पण सरपंच सौ जानवी जगदीश परब यांच्या हस्ते करण्यात आले.     हा विलगीकरण कक्ष ग्रामपंचायत मातोंड, ग्राम कृती समिती यांच्या मार्फत व स्थानिक सामाजिक संस्था, न्यू इंग्लिश स्कुल मातोंड हायस्कूलचे माजी विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी उपसरपंच अस्मिता परब, पश्चिम देवस्थान कमिटीचे माजी सदस्य हिरोजी परब,  सामाजिक कार्यकर्ते किशोर परब, निवृत्त केंद्रप्रमुख रावजी परब, वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण प्रभू तलाठी श्री गुरव, ग्रामपंचायत सदस्य सुभाष सावंत, वासुदेव कोंडये, सिताराम जाधव, सुवर्णलता जबडे, आरोग्य सेविका संजना कांबळी, पी.बी. पाटलेकर केंद्रप्रमुख श्री चव्हाण, ग्रामविकास अधिकारी तुषार हळदणकर, तलाठी श्री गुरव, आशा सेविका सायली राऊळ, माजी ग्रा प सदस्य सचिन कोंडये, सोसायटी सचिव अण्णा मातोंडकर, सामाजिक कार्यकर्ते सुखाजी परब, अमोल सावंत, कोतवाल बाबा शेटकर, ग्रा प कर्मचारी अरुण रेडकर, दिगंबर मातोंडकर आदी उपस्थित होते.     यावेळी या विलगिकरण कक्षासाठी येथील मिरीस्तेवाडी मित्रमंडळ यांच्यावतीने ३ सिलिंग फॅन, एलइडी बल्ब, १० वाफेच्या इलेक्ट्रिक मशीन, १५ फेसशिल्ड, ५० N95 मास्क, २०० मेडिकल मास्क, ५०० हॅण्ड ग्लोव्हज, सौ रेणुका अडवाणी यांच्यामार्फत ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, मातोंड हायस्कुलची १९८२- ८३ ची बॅच यांच्यावतीने गरम व थंड पिण्याच्या पाण्याची मशीन व इलेक्ट्रिक शेगडी, मातोंड हायस्कुलची १९९९-२००० ची बॅच यांच्यावतीने मिनी इलेक्ट्रिक चार्जिंग बॅटरी तसेच या कक्षाची लागणाऱ्या ६ खाटा आमदार दीपक केसरकर यांच्या मार्फत आमदार फंडातून व ६ खाटा तुळस ग्रामपंचायत मार्फत तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आल्या आहेत. तर आर्थिक स्वरूपात सामाजिक कार्यकर्ते जगदीश परब, राहुल प्रभू, ग्रामविकास अधिकारी हळदणकर व रावजी परब यांनी मदत केली. त्यांचे व सर्व दात्यांचे सरपंच यांनी आभार व्यक्त केले. ग्रा. प. मार्फत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना साठी सॅनिटायझर, मास्क, ऑक्सिमिटर, थर्मल गन आदी यासाठी देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दिपेश परब यांनी केले. 

You cannot copy content of this page